वारकऱ्यांना सुविध्दा द्या- पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंड्यातील वारकऱ्यांना सर्व मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या. - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील अनेक दिंड्यासह परजिल्ह्यातील दिंड्या आपल्या जिल्ह्यातून जातात. या दिंड्यातील वारकऱ्यांना पाणी, वीज, राहण्याची व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांचा मास्टर प्लॅन तातडीने तयार करून तो सर्व पालखी प्रमुखापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. आषाढी वारीच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी पालकमंत्री श्री विखे-पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगर...