Posts

Showing posts with the label कृषी सल्ला

सोयाबीन पीक लागवड करा

Image
सोयाबीन हे पीक १०० ते ११५ दिवसांचे आहे. सोयाबीनमध्ये १८ टक्के तेलाचे व ४३ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते. जगातील सोयाबीन उत्पादनापैकी ८० टक्के सोयाबीनपासून तेलनिर्मिती केली जाते. तेल काढल्यानंतर राहिलेल्या पेंडीचा उपयोग पशुखाद्यासाठी केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर या सोयाबीन पेंडीचा दर हा सोयाबीनच्या दरासाठी कारणीभुत असतो. या बहुगुणी सोयबीनचे जागतिक बाजारपेठेच्या मागणीमुळे दरवर्षी सोयाबीनचे भाव वाढतच आहे. शेतकर्यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होईल असे प्रतिपादन सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांनी केले. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे सोयाबीन व तूर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम कानडगाव येथे आयोजीत करण्यात आला होता. यावेळी या प्रशिक्षण कार्यक्रमात सोयाबीन पिकावर मार्गदर्शन करतांना कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली येथील सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख ब...