Posts

Showing posts with the label राहाता मंडल अधिकारी

क्यूआरकोड राजीव गांधी पुरस्कार

Image
क्यूआरकोडला पुरस्कार क्युआरकोडला पुरस्कार राहाता मंडळाधिकारी डॉ.मोहसिन शेख यांच्या ‘क्यूआरकोड’ संकल्पनेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार ! राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात पुरस्कार महसूली अर्धन्यायीक निकाल ‘क्यूआरकोड’ द्वारे घरबसल्या मिळणार   राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान २०२२-२३ साठी शासकीय कर्मचारी गटातील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राहाता मंडळाधिकारी डॉ.मोहसिन युसुफ शेख यांना जाहीर झाला आहे.  महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायीक निर्णय प्रथमच ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून देण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग राहाता मंडळ कार्यालयाने राबविला आहे. या कल्पक प्रयोगासाठी शेख यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नागरी सेवा दिनांक २१ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचे मुंबई येथे वितरण होणार आहे. रोख पन्नास हजार, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्याकरिता ‘‘...