शेतकरीभिमुख ४२हजार कोटी योजनाचा लोकार्पन सोहळा
शेतकरीभिमुख ४२ हजार कोटी खर्चाच्या कृषि योजनांचा लोकार्पन सोहळ्याचे प्रक्षेपण कृषि विद्यापीठात संपन्न घाडगे न्यूज @प्रतिनिधी नवी दिल्ली, पुसा येथील राष्ट्रीय कृषि विज्ञान परिसरात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शेतकर्यांसाठी ४२ हजार कोटींहून अधिक कृषि योजनांचा लोकार्पन सोहळा शनिवारी संपन्न झाला. यावेळी देशाचे कृषि मंत्री शिवाराजसिंग चौहान, राज्यकृषि मंत्री भागीरथ चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचेे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉॅ. गोरक्ष ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपन विद्यापीठात आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, मृदाशास्त्र व कृषि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भिमराव कांबळे, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, आंतरविद्याशाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, जीव...