आपघात टाळण्या साठी समृद्धीवर टायर तपासणार
समृध्दी महामार्गावर प्रवास करायचा मग गाडी चे टायर तपासणी केंद्र सुरु आपघात वाढतायत हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी व नागपूर अशा दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. समृध्दी महामार्गाच्या शिर्डी इंटरचेंज येथील टोलनाक्यावर ९ जून २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता परिवहन आयुक्तांच्या हस्ते टायर तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या टायर तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची मोफत तपासणी केली जाणार आहे. या सुविधेचा जास्तीत वाहनधारकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन अहमदनगर उप प्रादेशिक परिवन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे. हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डी ते नागपूर व दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर असा वाहतूकीसाठी सुरू झाला आहे. समृध्दी महामार्गावरील बहुतांशी अपघात वाहनांचे टायर फुटल्यामुळे होत आहेत. त्यामुळे अशा अपघातांना प्रतिबंध बसावा. यासाठी महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महाम...