Posts

Showing posts with the label इसत्रोत निवड

वैज्ञानिक सत्यजित मुसमाडे युवकानसाठी आयडॉल

Image
 वैज्ञानिक सत्यजित मुसमाडे  युवकासाठी नवा आदर्श घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  भारताची प्रगती केवळ राजकारण, उद्योग किंवा अर्थकारणावर अवलंबून नसते; ती विज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांवरही तितकीच अवलंबून असते. अशा वेळी छोट्या शहरातून एखादा तरुण देशातील सर्वोच्च वैज्ञानिक संस्थेत पोहोचतो, तेव्हा तो केवळ एका कुटुंबाचा किंवा शहराचा अभिमान राहत नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरतो. देवळाली प्रवरा येथील सत्यजित कृष्णा मुसमाडे यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मध्ये वैज्ञानिक म्हणून झालेली निवड ही अशीच अभिमानास्पद घटना आहे. इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळणे म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर देशाच्या प्रगतीत थेट योगदान देण्याची मोठी जबाबदारी असते. भारताने गेल्या काही वर्षांत अंतराळ संशोधनात मोठी झेप घेतली आहे. चंद्रयान, मंगळयान आणि सूर्य मोहिमांसारख्या यशस्वी प्रकल्पांमुळे भारताचे नाव जगभरात गौरवाने घेतले जात आहे. अशा संस्थेत देवळाली प्रवरासारख्या शहरातील तरुणाची निवड होणे ही त्या शहराच्या बौद्धिक आणि शैक्षणिक क्षमतेची साक्ष देणारी बाब आहे...