शौचालय दुरुस्ती बाबदचे आंदोलन तूर्त स्थगित-अप्पासाहेब ढुस
प्रसादनगर येथील शौचालय दुरुस्तीचे लेखी आश्वासन; आंदोलन तूर्त स्थगित – आप्पासाहेब ढूस घाडगे न्यूज। देवळाली प्रवरा नगरपरिषदेने प्रसादनगर भागातील दोन्ही सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने २६ जानेवारी रोजी होणारे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी दिली. ढूस म्हणाले की, आंदोलनापूर्वीच नगरपरिषदेने शौचालय दुरुस्तीचा निर्णय घेतल्याबद्दल नगरपरिषद प्रशासनाचे हार्दिक आभार. प्रहार जनशक्ती पक्ष व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाला जाग आली आणि शौचालय दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. प्रसादनगर प्रभात सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय असून तेथे साठलेल्या मैल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी आप्पासाहेब ढूस यांनी नगरपरिषदेला आंदोलनाचा इशारा देत निवेदन सादर केले होते. त्यामध्ये २६ जानेवारी रोजी वाजत-गाजत नगरपरिषद कार्यालयात शौचालयातील घाण...