Posts

Showing posts with the label भाजपा 4

राज्यसंभेवर महाराष्ट्राचे खासदार जाणार सात

Image
 राज्यसंभेवर खासदार जाणार सात रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित निर्णयांची परंपरा नवीन नाही. अनेकदा शेवटच्या क्षणी घेतलेले राजकीय निर्णय केवळ सत्तेचे गणित बदलत नाहीत, तर राजकारणाच्या प्रवाहालाही नवी दिशा देतात. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय त्याच प्रकारचा मानला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे ज्योती वाघमारे यांच्या सारख्या लढवय्या महिलेला संसदेत पाठवून शिवसेना सर्वसामान्य सैनिक न्याय देते हा विश्वास कायम ठेवून ज्योत से ज्योत जलाके चलो म्हणत अंधार दुर करण्याचा प्रयत्न करत शिवसेना प्रस्थापित पुढाऱ्यांचा पक्ष नसल्याचे सिध्द करत एका बानात अनेकांना घायाळ केले  महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी सात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. भाजपचे चार, शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन असे सात उमेदवार राज्यसभेवर जाणार आहेत. भाजपकडून विनोद तावडे, रामराव वडकुते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माया इव...