मुलांच्या आग्रहाखातर देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम सायकल पंढरपूर वारीला
मुलाच्या आग्रहाखातर देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम पंढरपूर सायकल वारीला ! वारी।शिवाजी घाडगे आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून हजारो वारकरी पायी दिंड्यांमधून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना, पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि सायकल संस्कृतीचा संदेश देणाऱ्या सायकल दिंडीने यंदाच्या वारीत विशेष लक्ष वेधून घेतले. देवळाली प्रवरा सायकल ग्रुपच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल वारीत देवळाली प्रवराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आपल्या मुलगा ध्रुवच्या आग्रहाखातर सहभाग घेत संपूर्ण सायकल वारी पूर्ण केली. वडील-मुलाने एकत्र पूर्ण केलेली ही वारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. शुक्रवारी देवळाली प्रवरातून या सायकल दिंडीचे उत्साहात प्रस्थान झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तब्बल चार हजारांहून अधिक सायकलस्वार या दिंडीत सहभागी झाले. पंढरपूरमध्ये या सायकल दिंडीने भव्य रिंगण घालत विठ्ठलभक्तीबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. देवळाली प्रवरा येथील सुमारे २५ सायकल वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते. त्यांनी विविध वृक्ष व औषधी वनस्पतींच्या बियाण्या...