हाळगाच्या कृषी महाविद्यालय सभागृह बांधण्यास शासकीय मजुरी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगावच्या सभागृह उभारणीस शासनाची परवागी 1432.89 लाखांचा निधी मंजूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे सभागृह (कॉन्फरन्स हॉल) इमारत उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून रु. 1432.89 लाखांची प्रशासकीय मान्यता आज दिनांक 05 मे, 2025 रोजी शासन निर्णय क्रमांक : कृषिवि-1424/प्र.क्र.75/7-अे, अन्वये प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या यासंदर्भातील पाठपुराव्याला यश आले असून या निर्णयाचे कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे. या महाविद्यालयाची स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकाराने 2018 मध्ये झाली. उद्या दिनांक 06 मे, 2025 रोजी श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त मंत्रीमंडळाची विशेष बैठक आयोजित करण...