Posts

Showing posts with the label एम पी के व्ही

अँटी रॅगींग दिवस साजरा

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात अँटी रॅगींग डे साजरा प्रेमाने आणि सहकार भावनेने वागल्यास विद्यार्थी जीवन आनंदी होते  राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सुनील भणगे रॅगींगमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाद होतात, मानसिक नैराश्यात जातात त्यामुळे शिक्षणावर परिणाम होतो. पदव्युत्तर महाविद्यालयात आलेले विद्यार्थी हे समजुतदार असतात. आपले पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी हे ध्येयवेडे आणि करिअर ओरियंटेड असल्याने ते कधीच रॅगींगच्या फंदात पडत नाहीत ही एक कौतुकाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी एकमेकांबरोबर प्रेमाने आणि सहकार भावनेने वागावे. यामुळे विद्यार्थी जीवन आनंदी होते असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सुनील भणगे यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी रॅगींग डे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ. सुनील भणगे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा आंतरविद्याशाखा जलव्यवस्थान विभाग प्रमुख...