Posts

Showing posts with the label विद्यापीठ संशोधित कांदा बियाणे

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कांदा बियाणे विक्री सुरुवात

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठात कांदा बियाणे विक्रीला प्रारंभ राहुरी :  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात ‘फुले समर्थ’ या कांदा वाणाच्या बियाण्यांची विक्री बुधवारपासून सुरू करण्यात आली. कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते करजगाव (ता. नेवासा) येथील सुनिता फुलसौंदर आणि बेलापूर येथील शेतकरी मारुतराव राशिनकर यांना ‘फुले समर्थ’ कांदा बियाण्यांचे वितरण करून विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. महात्मा फुले विद्यापीठाचे संशोधन केलेले बियाणे खरेदी साठी महाराष्ट्रातून शेतकरी येत असतात   यावेळी कुलगुरू डॉ. खर्चे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत ‘फुले समर्थ’ या वाणाची वैशिष्ट्ये सांगितली. आकर्षक लाल रंग, चांगली गुणवत्ता आणि बाजारातील वाढती मागणी यामुळे या वाणाला इतर कांदा वाणांच्या तुलनेत अधिक बाजारभाव मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या कांदा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करताना त्यांनी सुपीक, मध्यम ते भारी जमिनीची निवड करण्याचा सल्ला दिला. पेरणीपूर्वी बियाण्यांवर कार्बेन्डाझीम (बाविस्टीन) २ ग्रॅम प्रति किलो या प्रम...