Posts

Showing posts with the label कुरगुरुना दिले निवेदन

कर्मचाऱ्यांच्या उपोषण विरोधात प्रती मुक मोर्चा

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कर्मचार्यांचा उपोषणाविरोधात प्रती मुकमोर्चा राहुरी  महात्मा फुले कृषि विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. मिलिंद अहिरे यांनी  10 जुलैपासून सुरु केलेल्या उपोषणाविरोधात विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आज दुपारी जेवणाच्या सुट्टीत मोठ्या संख्येने मुकमोर्चा काढला व कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि उपकुलसचिव  व्ही.टी. पाटील यांना उपोषणाविरोधात निवेदन दिले. निवेदनात असे म्हटले की डॉ. डी. के. कांबळे यांनी विद्यापीठ प्रशासनाशी बोलणे झाल्यानंतर उपोषण मागे घेतलेले आहे. डॉ. मिलिंद अहिरे यांच्या सोबत सुद्धा प्रशासनाने बोलणी केलेली आहे. परंतु डॉ. अहिरे हे उपोषण मागे घेण्यास तयार नाही. महात्मा फुले कृषि विद्यापीठ ही संस्था राज्यात आणि देशात एक नावाजलेली संस्था असून मागील 56 वर्षांमध्ये शास्त्रज्ञांनी, अधिकार्यांनी आणि कर्मचार्यांनी अहोरात्र कष्ट करून या संस्थेच्या नावलौकिकात भर टाकलेली आहे.  विद्यापीठाच्या इतिहासात कोणत्याही कुलगुरुंकडून मागासवर्गीय किंवा कोणत्याही एका समुदायावर कधीही अन्याय झालेला नाही. सध्या विद्यापीठाची परिस्थिती रिक...