राहुरीची सप्तरंगी लढत लोकशाही सक्षम असल्याचे चिन्ह
राहुरीची ‘सप्तरंगी’ लढत लोकशाही सक्षम असल्याचे चिन्ह राजरंग ॥शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीने आता स्पष्टपणे बहुरंगी वळण घेतले आहे. सुरुवातीला बिनविरोध निवडणुकीची शक्यता वर्तवली जात असताना, शेवटच्या टप्प्यात ती पूर्णपणे फोल ठरली आणि अखेर ‘सप्तरंगी’ लढत उभी राहिली. हे चित्र केवळ राजकीय घडामोडींचे नसून लोकशाहीच्या जिवंतपणाचे द्योतक आहे. बिनविरोध निवडणूक ही काही वेळा सहमतीचे प्रतीक मानली जाते; परंतु अनेकदा ती स्पर्धेचा अभाव आणि मतदारांच्या निवडीवर मर्यादा आणणारी ठरते. राहुरीत मात्र अपक्षांसह विविध पक्षांच्या उमेदवारांनी मैदानात उतरून या प्रवृत्तीला छेद दिला. त्यामुळे मतदारांना पर्याय उपलब्ध झाले आणि “निवड” हा लोकशाहीचा मूलभूत हक्क अबाधित राहिला. या निवडणुकीत केवळ पक्षीय ताकद नव्हे, तर स्थानिक अस्मिता, घराणेशाहीविरोध, सहानुभूती आणि विकासाचे प्रश्न हेही केंद्रस्थानी आले आहेत. विशेष म्हणजे, पारंपरिक व प्रस्थापित राजकीय कुटुंबांची अनुपस्थिती ही या लढतीची वेगळीच बाजू आहे. त्यामुळे निवडणूक अधिक खुली झाली असून मतदारांवर अंतिम निर्णयाची मोठी जबाबदारी येऊन ठेप...