Posts

Showing posts with the label दिवंगत आ. शिवाजी कर्डीले

साहेब ही खुर्ची रिकामी आहे...

Image
साहेब, ही खुर्ची रिकामी आहे... अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक सध्या रंगात आली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे, सहकारातील सत्ताकेंद्रे आणि नेत्यांची ताकद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींच्या गर्दीत एक व्यक्तीची उणीव सातत्याने जाणवत आहे... ती म्हणजे दिवंगत माजी आमदार आणि सहकारातील मातब्बर नेते शिवाजी कर्डीले यांची. आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना अनेकांच्या ओठांवर एकच वाक्य येते—“साहेब, ही खुर्ची रिकामी आहे...” शिवाजी कर्डीले यांचे जिल्हा बँकेच्या राजकारणावर असलेले वर्चस्व सर्वश्रुत होते. त्यांच्या नावावर स्वतःचा सहकारी साखर कारखाना नसतानाही त्यांनी जिल्हा बँकेवरील आपली पकड वर्षानुवर्षे घट्ट ठेवली. सहकाराच्या राजकारणातील प्रत्येक हालचालीवर त्यांची नजर असायची. कोणत्या नेत्याशी कधी आणि कशी भूमिका घ्यायची, कोणत्या प्रश्नावर ठाम राहायचे आणि कोणत्या प्रसंगी तडजोड करायची, याचे त्यांना उत्तम भान होते. त्यांची कार्यपद्धतीही तितकीच वेगळी होती. ज्याला जी भाषा समजेल, त्या भाषेत संवाद साधण्या...