भोगू कॅप्टन अशोक खरात चौकशी प्रकरणी रुपाली चाकणकरानी एसआयटीकडे पाठ फिरवली
रुपाली चाकणकरानी एसआयटीकडे पाठ फिरवली? श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे भोगू कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात आता नवे वळण आले असून, या प्रकरणाशी संबंधित माजी महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एसआयटी चौकशीकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगू लागली आहे. खरात यांच्याशी असलेले त्यांचे संबंध यापूर्वीच चर्चेत आले होते आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, प्रकरण इतक्यावर न थांबता आता त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एसआयटीकडून रूपाली चाकणकर यांच्यासह ‘शिवनिका संस्थान’च्या आजी-माजी विश्वस्तांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही सोमवारी होणाऱ्या चौकशीसाठी चाकणकर या हजर राहिल्या नसल्याने तपास यंत्रणांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरण अधिक गंभीर होत चालले आहे. अशोक खरात संबंधित तब्बल 56 व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याची माहिती समोर आली असून, 11 पीडित महिलांनी त्याच्याविरोधात गुन्हे नोंदवले आहेत...