पद्मभूषण डॉ.बाळासाहेब पाटील जंयती शालेय शिक्षण मंत्री दिलीप केसरकर लोणीत
ना दिपक केसरकर लोणी जिल्हा परिषद शाळेचे बीओटी मॉडेल राज्यभर राबविणार - शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर लोणी येथे बीओटी तत्त्वावर बांधलेल्या जिल्हा परिषद शाळा व व्यापारी संकुल इमारतीचे लोकार्पण ‘‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल.’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. लोणी बु.येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुल इमारतीचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील होते. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे-पाटील, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के-पाटील, ह.भ.प उद्धव महाराज म...