मुळाच्या कार्यक्षेत्रावर पाऊस अजून रुसलेला
नगर जिल्ह्याची जलसंजवणी म्हणून ओळखले जाणारे राहुरीचे मुळा धरण पाणलोट व लाभ क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने. धरणाच्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी ऐन पावसाळ्यात दिवसेंदिवस खालवत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. समन्वय पद्धतीने यंदा मुळा धरणातून जायकवाडी कडे तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी जाण्याची शक्यता आहे. यंदा जून जुलै महिन्यात पाऊस झाला नाही ऑगस्ट मध्ये तर गेला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने अंगठा दाखविला. पाणलोट व लाभ क्षेत्रावर यंदा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या 21 हजार 94 दशलक्ष घनफूट (81.13) इतका पाणीसाठा आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उजव्या कालव्यातून 1550 क्युसेसने आवर्तन सुरू आहे.डाव्या कालवा बंद आहे. एकीकडे धरणाकडे महिन्याभरापासून पाण्याची आवक मंदावली आहे. तर दुसऱ्या बाजूला शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये धरणाचा पाणीसाठा दिवसेंदिवस घटक चालल्याचे परिस्थिती निर्मा...