मुळाच्या कार्यक्षेत्रावर पाऊस अजून रुसलेला

नगर जिल्ह्याची जलसंजवणी म्हणून ओळखले जाणारे राहुरीचे मुळा धरण 
 पाणलोट व लाभ क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने. धरणाच्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी ऐन पावसाळ्यात दिवसेंदिवस खालवत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. समन्वय पद्धतीने यंदा मुळा धरणातून जायकवाडी कडे तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी जाण्याची शक्यता आहे.
यंदा  जून जुलै महिन्यात पाऊस झाला नाही ऑगस्ट मध्ये तर  गेला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने अंगठा दाखविला. पाणलोट व लाभ क्षेत्रावर यंदा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे. 
26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या 21 हजार 94 दशलक्ष घनफूट (81.13) इतका पाणीसाठा आहे. 
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उजव्या कालव्यातून 1550 क्युसेसने आवर्तन सुरू आहे.डाव्या कालवा बंद आहे. एकीकडे धरणाकडे महिन्याभरापासून पाण्याची आवक मंदावली आहे. तर दुसऱ्या बाजूला शेतीसाठी आवर्तन सुरू आहे.
यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये धरणाचा पाणीसाठा दिवसेंदिवस घटक चालल्याचे परिस्थिती  निर्माण झाली आहे . 
 मुळा धरणातून साडेचार हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा मृत आहे. उद्योगधंदे व पिण्यासाठी 141.00 mcfy पाणी लागणार आहे. जायकवाडी ला तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी जाण्याची भीती आहे‌. धरणातून पाण्याची बाष्पीभवन दीड हजार दशलक्ष घनफूट इतके होते. मुळा धरणाच्या पातळीवर शेतीचे नियोजन केले जाते. ऊसाचे क्षेत्र घटू लागल्याने साखर  कारखान्यांवर याचा परिणाम होणार आहे तर दुसरीकडे पावसाने तान दिल्याने आहे तो ऊस पशु खाद्या कडे चालला आहे 
   "सद्यस्थितीत राज्यात सर्वत्र मान्सून परतला असला तरी मुळा पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी आहे. तसेच जायकवाडी धरणातील उपयुक्त साठाही कमी असल्यामुळे समन्यायी  पाणी वाटप कायद्यानुसार पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याची वेळ येऊ शकते. परिणामी खरीप आवर्तन दरम्यान पाटपाण्याचा वापर शेतकऱ्यांनी काटकसरीने करून उन्हाळ्यासाठी पाण्याची बचत करणे आवश्यक आहे.अशी माहिती धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी  बोलताना दिली आहे.
   "यंदा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतातील उभी पिके पाण्या वाचून आडवी झाली आहेत.तर मुळा धरणाकडे पाण्याची आवक धिम्या गतीने  असल्याने धरण भरेल की नाही अशी भीती आहे.दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायींनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळा धरण भरून नदी दुथडी भरून वाहावी व विहिरी व बोरच्या पाण्या पातळीत वाढ व्हावी  म्हणून शेतकऱ्यांच्या नजरा अभाळाकडे लागल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार