Posts

Showing posts with the label महत्व देशी गाई चे

देशी गाई व प्रशिक्षण केंद्र-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हह्ते भूमिपूजन

Image
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते भूमिपूजन संपन्न राहुरी - भारत हा पशुपालकांचा देश आहे व मी स्वतः देखील एक शेतकरी असून शेतीमध्ये तसेच डेअरी व पोल्ट्री सारख्या शेतीपूरक उद्योगांमध्ये काम केले आहे. दुग्ध व्यवसायाची सुरुवात करताना सुरुवातीच्या काळात देशी गाईंच्या ऐवजी संकरित गाई आणल्या होत्या. तथापि, गोपालन करताना असे निदर्शनास आले की संकरित गायीची तुलना देशी गाई बरोबर होऊच शकत नाही. पूर्वजांनी जतन केलेल्या व लुप्त होत असलेल्या देशी गाईंचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. भारतासारख्या खंडप्राय देशांमध्ये अनेक प्रकारच्या देशी गाई आहेत. नुकतीच विदर्भामध्ये कथनी या गाईच्या देशी गोवंशास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने मान्यता दिली आहे. देशी गाईचे तूप खूप आरोग्यदायी आहे. देशी गायीचे मानवी आरोग्यातील व जीवनातील महत्त्व लक्षात घेता नुकतेच राज्य शासनाने देशी गाईस राज्यमाता - गोमाता हा दर्जा बहाल केला आहे, ज्याचा देशी गाईंच्या संवर्धनासाठी मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने 50 पेक्षा अधिक गाई असणार्या गोशाळांना प्रती गाय प्रति दिन ...