राहुरी पोटनिवडणूकीत अक्षय कर्डीले यांची कुस्ती कोणा बरोबर
राहुरीत राजकीय पोटनिवडणुकीत अक्षय कर्डीले यांची कुस्ती कोणाशी, याकडे लक्ष घाडगे न्यूज।प्रतिनिधी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अक्षरशः ‘यात्रेचा’ माहोल पाहायला मिळत आहे. एकीकडे नामवंत पहिलवानांच्या कुस्त्यांची चर्चा रंगत असताना, ऐनवेळेस रेवड्या वरची कुस्ती होते की काय दुसरीकडे राजकीय आखाड्यात कोण कोणासमोर उभे राहणार याची उत्सुकता आहे. या निवडणुकीत रंगत वाढत असताना भारतीय जनता पक्षाकडून ही लढत शेवटपर्यंत कशी सोपी करता येईल, याबाबत रणनीती आखली जात असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी इच्छुक उमेदवार तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या नेत्यांमध्ये बंद दाराआड सविस्तर चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार का आणि त्यांचा अधिकृत उमेदवार कोण असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वाता...