राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियानात नगर जिल्हासाठी तीन पुरस्कार
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, मुख्याधिकारी विकास नवले आणि मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांना पुरस्कार राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार प्राप्त झाले असून सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले आणि राहता येथील मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते. जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. २०२३-२४ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना पुरस्कार प्...