Posts

Showing posts with the label दरोज खातो बुचकुलभर गोळ्या

भोगू कॅप्टन अशोक खरात चे शारीरिक व सामाजिक वजन घटले

Image
भोगू कॅप्टन अशोक खरात चे शारीरिक व सामाजिक  वजन घटले  श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  एकेकाळी ‘अवतारी पुरुष’ म्हणून डोक्यावर घेतले गेलेला अशोक खरात आज कारागृहात बसून जामिनाची वाट पाहत आहेत ही केवळ एका व्यक्तीची घसरण नाही; तर अंधश्रद्धा, आंधळा विश्वास आणि प्रभावशाली जाळ्याच्या बळावर उभ्या राहिलेल्या बनावट अध्यात्मिक बाजारपेठेचा पर्दाफाश आहे.  ज्यांनी स्वतःला चमत्कारांचा केंद्रबिंदू म्हणून मांडले, तोच आज कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे, हीच या प्रकरणाची सर्वात मोठी विडंबना ठरते. स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या अशोक खरात यांची तब्येत आणि प्रतिमा—दोन्हीही सध्या मोठ्या दबावाखाली असल्याचे चित्र समोर येत आहे. एकेकाळी राजकारणी, मोठे व्यावसायिक, उच्च अधिकारी तसेच प्रतिष्ठित भक्तगण यांच्यात वावर असलेले खरात यांनी उभारलेले कथित ‘आध्यात्मिक साम्राज्य’ भक्कम मानले जात होते. त्या बळावर ‘अवतारी पुरुष’ अशी प्रतिमा तयार करत त्यांनी प्रभाव निर्माण केला होता; मात्र आता त्याच प्रतिमेला तडा गेल्याचे दिसत आहे. माहितीनुसार, अटकेनंतर खरात यांचे सुमारे ७ किलो व...