वकील रस्त्यावर येत म्हणतायत खड्डे आहेत मायलॉर्ड
‘वकील रस्त्यावर येत म्हणतायत, खड्डे आहेत मायलॉर्ड!’ घाडगे न्यूज।प्रतिनिधी नगर–मनमाड महामार्गाचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, या मागणीसाठी राहुरी वकील संघाने मंगळवारी आक्रमक भूमिका घेत भर पावसात रास्ता रोको आंदोलन केले. ‘महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत, मायलॉर्ड... आता तरी शासनाने या रस्त्याकडे गांभीर्याने पाहावे,’ अशा संतप्त भावना व्यक्त करत वकील बांधव-भगिनींनी शासनाचे लक्ष महामार्गाच्या दुरवस्थेकडे वेधले. गेल्या अनेक वर्षांपासून नगर–मनमाड महामार्गाच्या कामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. या महामार्गाच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही प्रवाशांना मात्र खड्डे, धुळीचा त्रास, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने आता अधिक अंत न पाहता महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राहुरी येथील ग्रीन हॉटेल चौकात झालेल्या या रास्ता रोको आंदोलनात वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते. भर पावसातही आंदोलन सुरू ठेवत वकिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाला नागरिक, शेतकरी संघटना तसेच वाहन संघटन...