Posts

Showing posts with the label संबंधितांना निवेदन

उजव्या कालव्याला पाणी सोडा-प्रहार

Image
उजवा कालव्याला  पाणी सोडा- प्रहारचे तालुध्यक्ष सुरेश लांबे  यांची मागणी   मुळा धरण उजव्या कालव्यातून शेती पिकांसाठी त्वरित पाणी आवर्तन सोडण्याची शेतकरी नेते सुरेश लांबे यांनी राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा ऋतू सुरू होऊन अडीच महिने उलटुनही नगर जिल्ह्यासह मुळा धरण लाभक्षेत्रात अनेक ठिकाणी पेरणी योग्य पाउस न झाल्यामुळे खरीप हंगामातील अनेक शेतक-यांना कपाशी, सोयाबीन, बाजरी व ईतर पिकांची पेरणी करता आलेली नाही, तर काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने त्या भागात पेरणी झाली. परंतु त्यानंतर पाऊस न पडल्याने पिके जळुन चालली आहे. आज रोजी मुळा धरणात 20 टीएमसी पेक्षा जास्त पाणी साठा उपलब्ध असुन अजुनही नवीन पाण्याची आवक सुरु आहे. अजुनही दिड महिना पावसाळा हंगाम शिल्लक असुन मुळा धरणात नवीन पाण्याची आवक होऊन धरण पुर्ण क्षमतेने भरु शकते. परंतु आज रोजी शेतक-यांनी पेरणी केलेल्या पिकांसाठी उजव्या कालव्याला पाणी सोडल्यास जिवदान मिळेल. तरी आठ दिवसांपासुन मुळा डाव्या कालव्याला पाणी सोडुन त्या भागातील श...