Posts

Showing posts with the label इतिहास संशोधक हरपला

पत्रकारांचे भुषण हरपले

Image
पत्रकारितेतील ‘भूषण’ हरपले... भूषण।शिवाजी घाडगे  मृत्यू कोणत्या रूपाने समोर येईल, हे कुणालाच सांगता येत नाही. मात्र आपल्या आवडत्या कामात, आपल्या ध्यासात आणि समाजासाठी ज्ञानदान करत असताना मृत्यूने कवेत घेणे, हे फारच विरळा नशिबी येते. अहमदनगरचे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक आणि वारसा संवर्धन चळवळीचे प्रणेते भूषण देशमुख यांच्या निधनाने नगर जिल्ह्याने केवळ एक पत्रकार गमावलेला नाही, तर आपल्या इतिहासाचा एक चालता-बोलता ग्रंथच हरवला आहे. भुईकोट किल्ल्यावर इतिहासाची माहिती देत असताना झालेला सर्पदंश आणि त्यानंतर आलेले निधन हा केवळ एक अपघात नाही; तर आपल्या वारशासाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तीच्या कार्याचा कळसाध्याय आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिले. इतिहास सांगताना, वारसा जपण्याचा संदेश देताना आणि समाजाला ज्ञानाचा प्रकाश देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पत्रकारिता क्षेत्रात वेग, स्पर्धा आणि प्रसिद्धीची धडपड वाढत असताना भूषण देशमुख यांनी पत्रकारितेला सामाजिक बांधिलकीचे स्वरूप दिले. त्यांनी कधीही पत्रकारितेचा वापर वैयक्तिक लाभासाठी केला नाही. सत्तेच्या...