एम पी के व्हीत जल संशोधन बैठक
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे कृषि जल कंन्सोर्टिया संशोधन प्रकल्पांची वार्षिक आढावा बैठक संपन्न भारतीय कृषि संशोधन परिषद अंतर्गत असलेल्या कृषि जल कंन्सोर्टिया संशोधन प्रकल्पांची वार्षिक आढावा बैठक महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे पार पडली. या बैठकीमध्ये भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली या संस्थेचे उपमहासंचालक डॉ. एस.के. चौधरी हे अध्यक्षस्थानी तर सहाय्यक महासंचालक डॉ. ए. वेलमुरुगन व डॉ. अदलूल इस्लाम उपस्थित होते. या प्रसंगी भारतीय जल व्यवस्थापन संस्था, भुवनेश्वर येथील संचालक डॉ. ए. सारंगी, प्रकल्प समन्वयक डॉ. एस.के. जेना व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. एस.डी. गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. एस.ए. रणपीसे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील तसेच देशातील विविध संशोधन संस्थेतील कंन्सोर्टिया प्रकल्पांचे प्रमुख संशोधक उपस्थित होते. यावेळी विविध संशोधन संस्थेतील सुरु असलेल्या कंन्सोर्टिया प्रकल्पातील प्रमुख संशोधकांनी तेथील सुरु असलेल्या संशोधनांचे सादरीकरण केले. संपुर्ण कंन्सोर्टिया प्रकल्पांचे प्रकल्प समन्वयक डॉ. एस.के. जेना यांनी सर्व प्रकल...