पराभवाच्या राखेतून उगवलेले यश सत्यजित ने खरे करून सत्य सिध्द केले
पराभवाच्या राखेतून उगवलेले यश… सत्यजितने खरे ‘सत्य’ सिद्ध केले! ताज रिपोर्ट घाडगे न्यूज ।शिवाजी घाडगे लोकशाहीच्या रणांगणात मतपेटीचा कौल अंतिम असतो. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून नगराध्यक्षपदा साठी उभे राहिलेले कृष्णा नानासाहेब मुसमाडे यांना पराभव स्वीकारावा लागला हा जनतेचा निर्णय होता. पण नियतीने त्याच घरासाठी वेगळाच विजय राखून ठेवला होता. राजकीय पटलावर पराभवाची नोंद झाली; मात्र ज्ञानाच्या आकाशात त्यांच्या सुपुत्राने तेजस्वी झेप घेत कुटुंबाची आणि गावाची मान अभिमानाने उंचावली. सत्यजित मुसमाडे यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मध्ये वैज्ञानिक म्हणून झालेली निवड ही केवळ वैयक्तिक यशकथा नाही; ती देवळाली प्रवराच्या इतिहासातील अभिमानाची सुवर्णरेषा आहे. नगराध्यक्षपद पाच वर्षांचे; पण वैज्ञानिक पद आयुष्यभराचे. सत्तेची खुर्ची क्षणभंगुर असते; पण ज्ञानाची उंची चिरंतन असते. म्हणूनच हा विजय केवळ एका तरुणाचा नाहीतो कर्तृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक घराचा आहे. कृष्णा मुसमाडे हे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मितभाषी, संयमी...