विभागीय संचालक विनीत नारायण
विभागिय संचालक नारायण साई आदर्श मल्टीस्टेट सारख्या संस्थांनी आर्थिक क्रांती घडवून पतसंस्था चळवळीमध्ये आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. शिवाजी कपाळे यांनी इतर संस्थांना मार्गदर्शन करत असताना पतसंस्था चळवळीला व सहकाराला योग्य दिशा देण्याचे काम केले असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ महाराष्ट्र व गोवाचे विभागीय संचालक विनीत नारायण यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ महाराष्ट्र व गोवाचे विभागीय संचालक विनीत नारायण यांनी साई आदर्श मल्टीस्टेट मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली या प्रसंगी त्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजी कपाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आदर्श पतसंस्थेचे व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज, योग प्रशीक्षक किशोर थोरात, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन ,हैदराबादचे नकुल सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला शिवाजी कपाळे यांनी संस्थेचा लेखाजोखा मांडताना सांगितले की, अगदी दहा वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेने 150 कोटी ठेवींचा पल्ला पार केला आहे. अर्थकारणातच नव्हे तर समाजकारणातील संस्था अग्रेसर...