अहरात भरडधान्य वापर करा अपर सचिव अनूप कुमार
आहारात ज्वारी व बाजरीचा वापर करा,गोरेपणावर हर एक जण भुलता है - अपर मुख्य सचिव अनूप कुमार हिदुस्थानच्या स्वातंत्र्य प्राप्ती नंतर घडलेल्या हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. अन्नाची शाश्वतता झाली. असे असले तरी मैदा युक्त अन्न धान्य वापर आपल्या आहारात वाढल्यामुळे आरोग्याच्या समस्या जटीलझाल्या. आपली पूर्वीची खाद्य संस्कृती बदलल्यामुळे आपल्याला आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. पूर्वीच्या सिंधु संस्कृतीमध्ये बाजरी वापराचा उल्लेख आढळतो. आद्य संस्कृतीमध्येही हीच खाद्य संस्कृती श्रेष्ठ मानली जात होती. पौष्टिक तृणधान्य पिकविणार्या शेतकर्याला दोन पैसे अधिक मिळावेत आणि त्याचबरोबर शहरातील ग्राहकालाही तृणधान्य वाजवी दरात उपलब्ध व्हावी. आपणा सर्वांना आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर वाढवावा लागणार आहे. त्याकरीता श्रीअन्न निरंतर हे ब्रिद समोर ठेवून निरंतर चालणार्या मिशनची चांगल्या आरोग्यासाठी भविष्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार यांनी शनिवारी केले. कृषि विभाग, महाराष्ट्र शा...