अहरात भरडधान्य वापर करा अपर सचिव अनूप कुमार

आहारात ज्वारी व बाजरीचा वापर करा,गोरेपणावर हर एक जण भुलता है 
- अपर मुख्य सचिव अनूप कुमार

हिदुस्थानच्या स्वातंत्र्य प्राप्ती नंतर घडलेल्या  हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्यामध्ये  स्वयंपूर्ण झाला.  अन्नाची शाश्वतता झाली. असे असले तरी मैदा युक्त अन्न धान्य वापर आपल्या आहारात वाढल्यामुळे आरोग्याच्या समस्या जटीलझाल्या. आपली पूर्वीची खाद्य संस्कृती बदलल्यामुळे आपल्याला आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. पूर्वीच्या सिंधु संस्कृतीमध्ये बाजरी वापराचा उल्लेख आढळतो. आद्य संस्कृतीमध्येही हीच खाद्य संस्कृती श्रेष्ठ मानली जात होती. पौष्टिक तृणधान्य पिकविणार्या शेतकर्याला दोन पैसे अधिक मिळावेत आणि त्याचबरोबर शहरातील ग्राहकालाही तृणधान्य वाजवी दरात उपलब्ध व्हावी. आपणा सर्वांना आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर वाढवावा लागणार आहे. त्याकरीता श्रीअन्न निरंतर हे ब्रिद समोर ठेवून निरंतर चालणार्या मिशनची चांगल्या आरोग्यासाठी भविष्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव  अनूप कुमार यांनी शनिवारी केले. 
कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शाश्वत श्रीअन्न शेती या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन विद्यापीठातील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी  अनूप कुमार बोलत होते. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते करण्यात आले.  अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार,  डॉ. श्रीमंत रणपिसे,  डॉ. सी.एस. पाटील, राज्याचे विस्तार व प्रशिक्षण कृषि संचालक  दिलीप झेंडे, आत्माचे संचालक डॉ. दशरथ तांभाळे उपस्थित होते. 
यावेळी आपल्या मार्गदर्शनात पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या की आपले मुख्य अन्न हे भरडधान्यच असावे, तेच आपण आपल्या शेतात पिकवावे व तेच खावे. मला राहयला घर देखील नव्हेत मात्र मी गावरान बियाने राखेत जपून ठेवली आज माझ्या कडे शंभर हुन अधिक गावरान बियाने बीज बॅकेत आहेत 
मी केलेले काम प्रत्येक शेतकर्यापर्यत जायला हवे. प्रत्येक गावात राहिबाई तयार व्हावी असा आशावाद त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठाने ज्वारी, बाजरी तसेच नाचणी, बर्टी, वरई यासारख्या पौष्टिक तृणधान्य पिकांचे उन्नत वाण व तंत्रज्ञान आणि रब्बी ज्वारीची पंत्रसूत्री शेतकर्यांसाठी विकसीत केली आहे. पारंपारीक शेतीत भरडधान्याचे खुप महत्व आहे. भरडधान्य हे कमी कालावधीत येणारे, कमी पाण्याची आवश्यकता असणारे व लागवडीसाठी खर्चिक नसुन उच्च पोषणमुल्य असणारी व आपल्या पर्यावरणासाठी महत्वाची आहेत. आता आपल्याला अन्न सुरक्षिततेकडून पौष्टिक अन्न सुरक्षिततेकडे जायचे आहे. श्री. दिलीप झेंडे यांनी पौष्टिक तृणधान्य या विषयावर सादरीकरण केले. या कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्य पुस्तिका व विविध घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी भरड व तृणधान्याच्या कणसांपासून बनविलेला गुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत केले. 
यावेळी सहा तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्वारी व बाजरी, नाचणी व बरी, वरई व कोडो, राळा व बर्टी, विपणन, प्रसिद्धी व मूल्य साखळी आणि धोरणात्मक बाबी व भविष्यातील दिशा या विषयांवर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तांत्रिक सत्रात राज्यातील कृषि विद्यापीठांचे तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या संस्थांचे तृणधान्य पीकविषयक तज्ञ, तसेच कृषि विभागाचे अधिकारी व प्रगतशील शेतकरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सी.एस. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले. 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार