Posts

Showing posts with the label 423 प्रश्न

अ‍ॅक्टिव्ह खासदार डाॅक्टर सुजय विखे

Image
भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनहिताचे प्रश्न उपस्थित करीत संसदेत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. यामुळे १७व्या लोकसभेतील १० सर्वोत्तम नवोदित सदस्यांमध्ये त्यांची नोंद घेण्यात आली आहे. अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून जाहीर झालेल्या लोकसभा सचिवालयाच्या आकडेवारीनुसार २५० नवोदित खासदारांमध्ये महाराष्ट्राच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची संसदेतील कामगिरी सरस ठरल्याने बिर्ला यांनीही खासदार सुजय विखे यांचे विशेष कौतुक केले आहे.  १७ व्या लोकसभेमध्ये २७० खासदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्यापैकी मंत्री न झालेल्या २५० नवोदित सदस्यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांनी जनहिताचे ४१ हजार १०४ प्रश्न संसदेत उपस्थित केल्याचे आकडेवारीत स्पष्ट होते. या सदस्यांपैकी महाराष्ट्राच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ४२६ तारांकित प्रश्नोत्तराच्या चर्चेत सहभागी होत आपले लक्ष वेधले आहे. जाहीर झालेल्या आकडेवारी नुसार तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, चर्चासत्र आणि लोकसभेच...