सायकलवरून प्रचार करत आहेत अपक्ष उमेदवार महेश हापसे
सायकलवरून साधा पण प्रभावी प्रचार; अपक्ष उमेदवार महेश हापसे यांची वेगळी हवा राजरंग।शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध उमेदवारांचा प्रचार रंगात आला असताना, अपक्ष उमेदवार महेश हापसे यांनी आपल्या साध्या आणि वेगळ्या प्रचार पद्धतीमुळे मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. निवडणूक म्हटली की मोठा झगमगाट, महागड्या गाड्या आणि भव्य रॅली असे चित्र सामान्यतः पाहायला मिळते. मात्र हापसे यांनी या पारंपरिक चौकटीला छेद देत सायकलवरून प्रचार करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सायकलवरून गावोगावी फिरत ते थेट मतदारांशी संवाद साधत आहेत. या माध्यमातून ते आपली भूमिका, विचार आणि स्थानिक प्रश्नांविषयीची बांधिलकी सहज आणि प्रभावीपणे मांडत आहेत. त्यांच्या या साधेपणातच प्रामाणिकपणा आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची खरी इच्छा दिसून येते, अशी भावना अनेक मतदार व्यक्त करत आहेत. निवडणुकीत विजय-पराजय हा प्रक्रियेचा भाग असतो. कोणीतरी निवडून येणार, तर काही उमेदवारांना पराभव पत्करावा लागणार, हे वास्तव असले तरी महेश हापसे यांच्यासारखे जिद्दी उमेदवार लोकशाही प्रक्रियेला बळकटी देतात. त्यांच्या...