परित्यक्तया महिलांनी बनविलेल्या वस्तू विक्री प्रदर्शन
परितक्तया महिलांनी बनवलेल्या ‘सक्षम प्रदर्शन व विक्री’ उपक्रमाचा शुभारंभ टीम @घाडगे न्यूज परितक्त्या महिलांना सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक अनेक समस्या भेडसावत असून, या महिलांना त्यांच्या पायावर उभे करून समाजात ताठ मानेने जगण्यासाठी सर्वंकष व एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सदन, नवी दिल्लीच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी केले. आम्रपाली गार्डन येथे महिलांच्या सामर्थ्याला व स्वावलंबनाला नवी दिशा देणाऱ्या दोन दिवसीय ‘सक्षम प्रदर्शन व विक्री’ उपक्रमाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, राहुल शेळके, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, पत्रकार सुधीर लंके, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, विनायक देशमुख, नितेश बनसोडे, योगिता सत्रे, प्रवीण कदम, 'उमेद'चे जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप आदी उपस्थित होते. आर. विमला यांनी आपल्या भाषणात परितक्त्या महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा वे...