बेकायदेशीर ड्रोनविरोधात शोध मोहीम सुरूच;संख्या रोडावली
बेकायदेशीर ड्रोनविरोधात शोधमोहीम सुरूच संख्या रोडावली राहुरी | राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद बेकायदेशीर ड्रोनच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासनाची मोहीम सुरूच असून ड्रोन संख्या मात्र रोडावली आहे नागरिकांच्या दृष्टीस पडणाऱ्या या ड्रोनमुळे परिसरात निर्माण झालेले भीती आणि संभ्रमाचे वातावरण आता हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसत असले, तरी या ड्रोनचा उगम, मालक आणि उद्देश अद्यापही स्पष्ट झालेला नाही. सोमवारी रात्री राहुरी पोलिसांनी पुन्हा एकदा ‘मिशन अँटी ड्रोन’ अंतर्गत विशेष तपास मोहीम राबविली. या मोहिमेत अत्याधुनिक अँटी-ड्रोन गन तसेच लेझर गनच्या सहाय्याने आकाशातील संशयास्पद हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ड्रोनची उंची, दिशा आणि हालचाली यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष उपकरणांचा वापर करण्यात आला. या मोहिमेत राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस कर्मचारी सूरज गायकवाड, पुणे येथील अँटी-ड्रोन पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप जगताप, जालिंदर साखरे, प्रमोद ढाकणे, सोहेल सय्यद, रियाज शेख यांच्या...