Posts

Showing posts with the label शोक

नसिफा अब्दुल सत्तार यांचे निधन

Image
नफिसा अब्दुल सत्तार बेगम यांचे दुःखद निधन सिल्लोडच्या माजी नगराध्यक्षा तथा सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम पत्न  होत . त्यांच्या निधनाने सिल्लोड शहरासह राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. नसिफा सत्तार  केवळ आमदारांच्या पत्नी म्हणूनच नव्हे, तर सिल्लोडच्या राजकारणातील एक सक्रिय व प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा म्हणून त्यांनी शहराच्या विकासासाठी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामांना चालना मिळाली होती. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे मृत्यूमागील कारणांविषयी स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या अचानक घडलेल्या घटनेमुळे सत्तार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सिल्लोड शहराने एक प्रभावी नेतृत्व गमावले आहे.

माजी प्राचार्य भागवत ढूमने काळाच्या पडद्या आड

Image
माजी प्राचार्य भागवत ढुमने यांचे स्वातंत्र्य दिनी दुःखद निधन झाले असुन  गेली 36वर्ष आध्यापन क्षेत्रात त्याचे मोठे योगदान होते  राहुरी फॅक्टरी गुरुकुल वसाहत येथील प्रा.भागवत छगनराव ढुमणे वय (८३) यांचे स्वातंत्र्य दिनी मंगळवारी दि.१५/०८/२०२३ सकाळी ८:०० वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.         त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 13 वाजता प्रसादनगर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या निधनाने सर्वत्र हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे  त्यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर्दश विद्यालय ब्राम्हणी येथे प्राचार्य म्हणून सेवा केली  त्याच्या पच्छात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे संत ज्ञानेश्वर विद्यालयतील सेवक पंकज  व कृषी अधिकारी अशितोक्ष,मुलगी नुतन यांचे ते वडील होत