शेतकरी दौ-याचे आयोजन
शेतकरी अभ्यास दौर्याचे आयोजन राहुरी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी.के. ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत निघोज, ता. पारनेर येथे रसाळ डाळिंब फार्म येथे एक दिवसीय शेतकरी अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा प्रगतशील शेतकरी राहुल रसाळ यांनी शेतकर्यांना त्यांच्या प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की डाळिंब लागवड, तण नियंत्रण, एकात्मिक अन्नदव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले. डाळिंब लागवड ही उत्तर दक्षिण दिशेस 14x10 फुटावर केल्यास पिकास चांगला सुर्यप्रकाश उपलब्ध होतो. डाळिंब बागेच्या चोहोबाजूला गिन्नीसारख्या उंच वाढणार्या पिकांची लागवड केल्यास त्याचा वारा विरोधक म्हणुन चांगला उपयोग होतो तसेच वार्यापासून फळबागेचे संरक्षण होते. फवारणी करतांना हवामान आधारीत घटकांची स्थिती लक्षात घेऊन व्यवस्थित फवारणी सायंकाळी केल्यास त्याचा चांगला परिणाम किड व रोग नियंत्रणावर दिसून येतो. यावेळी त्यांनी बहार ...