मुख्याध्यापकाला 50लाच घेतांना पकडले
घारगाव येथे मुख्याध्यापक लाच घेताना रंगेहात; संस्था अध्यक्ष फरार राहुरी।प्रतिनिधी वरीष्ठ वेतन श्रेणीचा लाभाचा ठराव मंजूर करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घारगावचे मुख्याध्यापक संजय दगडू राणे (वय ५५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने रंगेहात पकडले. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी, श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ, आणेचे अध्यक्ष प्रकाश चांदमलजी बोरा यांचा शोध पोलीस करीत आहे. तक्रारदार या शिक्षिका आहेत. त्यांची शिक्षिका म्हणून १५ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. १२ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या वरीष्ठ वेतन श्रेणीसाठी त्यांनी २०२४-२५ मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र जमा केले होते. मात्र तरीही त्यांना वरीष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी जून २०२६ मध्ये मुख्याध्यापक राणे यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जावर ठराव मंजूर करून देण्यासाठी संस्था अध्यक्ष बोरा यांनी ५० हजार रुपये मागितल्याचे मुख्याध्यापकांनी तक्रारदार यांना सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी आणे येथे ज...