Posts

Showing posts with the label जिल्ह्यात नद्याचे विविध जल पुजन

पाण्याचा विवेकी वापरासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे- जिल्हाधिकारी डाॅ पंकज आशिया

Image
पाण्याच्या  विवेकी वापरासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे -डॉ.पंकज आशिया  जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात कृषी विभागाने पाणी वापर संस्थांसोबत समन्वय साधून पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पद्धतीत बदल घडवून आणण्यावर भर द्यावा आणि सर्व विभागांनी मिळून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले.    नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवडाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेट्ये, संतोष सांगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे आदी उपस्थित होते.    जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सर्व शासकीय विभागांचा सहभाग अपेक्षित आहे. सर्वांनी समन्वयाच्या माध्यमातून उद्दिष्टानुसार कार्यक्रमाचे योग्य व्यवस्थापन करावे. त...