महाविकास आघाडीचा घोळ की राजकीय पेच नगराध्यक्ष करण ससाणे लढतील
महाविकास आघाडीचा घोळ की राजकीय पेच करण ससाणे लढतील राजरंग।शिवाजी घाडगे अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण दिले आहे. महायुतीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी जवळपास निर्विघ्न ठरत असताना, महाविकास आघाडी मात्र उमेदवारीच्या प्रश्नावर गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली. हा केवळ समन्वयाचा अभाव आहे की त्यामागे काही मोठी राजकीय रणनीती दडलेली आहे, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. महाविकास आघाडीने जागावाटप केले, चर्चा केली, संभाव्य उमेदवारांची नावे पुढे आली; मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ येताच चित्र पूर्णपणे बदलले. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून चर्चा असलेले नगराध्यक्ष करण ससाणे अपक्ष म्हणून अर्ज दाखल करतात, जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांना ऐनवेळी थांबवले जाते आणि खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके निवडणुकीपासून दूर राहतात. या सर्व घटनाक्रमातून महाविकास आघाडीचा समन्वयाचा अभाव स्पष्टपणे समोर येतो. राजकारणात पराभवापेक्षा चुकीचा संदेश अधिक घातक असतो. या निवडणुकीत महाविकास आघाडीने लढण्याप...