Posts

Showing posts with the label सध्या तरी एकच कुलसचिव

कुलसचिव मीच मुकुंद शिंदे

Image
कुलसचिव मीच मुकुंद शिंदे  महात्मा फुले कृषि विद्यापीठात कुलसचिव या पदावरुन प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यासंदर्भात महात्मा फुले कृषि विद्यापीठाने खुलासा दिला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे यांनी सांगितले की दि. 8 ऑक्टोबर, 2024 रोजी शासनाच्या कृषि मंत्रालयाच्या स्तरावरुन श्री. अरुण आनंदकर यांना कार्यमुक्त केले होते. या दिवशी ते कार्यालयीन वेळेपुर्वी कार्यालय सोडून गेले होते. त्यामुळे कार्यालयाचा शिपाई कार्यमुक्त आदेश आणि पदभार हस्तांतरण दस्तावर घेवून त्यांच्या घरी गेला असता त्यांनी तो आदेश स्वीकारला नाही आणि पदभार हस्तांतर दस्तावरवर सही करण्यास नकार दिला. शासनाच्या आदेशानुसार सदर आदेश स्वीकारणे त्यांनी गरजेचे होते. त्यांनी हा आदेश स्वहस्ते घेणे नाकारल्यामुळे त्यांना हा आदेश विद्यापीठाने ईमेल तसेच पोस्टाने आर.पी.ए.डी.द्वारे पाठविला. याचप्रकारे ते वारंवार कुलगुरुंच्या आदेशाचे उल्लंघन करुन त्यास केराची टोपली दाखवत असे. वास्तविक विद्यापीठाचे कुलगुरु हे नियुक्ती आणि अनुशासनात्मक अधिकारी असल्याने त्यांचे आदेश पाळणे हे बंधनकारक आहे. प्रशासनाच्या अशा व...