कुलसचिव मीच मुकुंद शिंदे

कुलसचिव मीच मुकुंद शिंदे 

महात्मा फुले कृषि विद्यापीठात कुलसचिव या पदावरुन प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यासंदर्भात महात्मा फुले कृषि विद्यापीठाने खुलासा दिला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे यांनी सांगितले की दि. 8 ऑक्टोबर, 2024 रोजी शासनाच्या कृषि मंत्रालयाच्या स्तरावरुन श्री. अरुण आनंदकर यांना कार्यमुक्त केले होते. या दिवशी ते कार्यालयीन वेळेपुर्वी कार्यालय सोडून गेले होते. त्यामुळे कार्यालयाचा शिपाई कार्यमुक्त आदेश आणि पदभार हस्तांतरण दस्तावर घेवून त्यांच्या घरी गेला असता त्यांनी तो आदेश स्वीकारला नाही आणि पदभार हस्तांतर दस्तावरवर सही करण्यास नकार दिला. शासनाच्या आदेशानुसार सदर आदेश स्वीकारणे त्यांनी गरजेचे होते. त्यांनी हा आदेश स्वहस्ते घेणे नाकारल्यामुळे त्यांना हा आदेश विद्यापीठाने ईमेल तसेच पोस्टाने आर.पी.ए.डी.द्वारे पाठविला. याचप्रकारे ते वारंवार कुलगुरुंच्या आदेशाचे उल्लंघन करुन त्यास केराची टोपली दाखवत असे. वास्तविक विद्यापीठाचे कुलगुरु हे नियुक्ती आणि अनुशासनात्मक अधिकारी असल्याने त्यांचे आदेश पाळणे हे बंधनकारक आहे. प्रशासनाच्या अशा वरिष्ठ पदावरील अधिकार्याने असे वागणे अशोभणीय आहे. त्यांना दि. 8 ऑक्टोबर, 2024 रोजी शासनाने कार्यमुक्त केले. विद्यापीठाने दैनंदिन कामकाज सुरळीत चालावे यासाठी डॉ. मुकुंद शिंदे यांची कुलसचिवपदी नियुक्ती केली. दि. 9 ऑक्टोबर, 2024 रोजी श्री. आनंदकर यांनी आदेशाचे पालन करुन मुळ आस्थापनेवर रुजु होणे आवश्यक होते. तथापी ते मा. मॅटमध्ये गेले. मा. मॅटने दि. 11 ऑक्टोबर, 2024 रोजी जैसे थे चा निकाल दिला. दि. 8 ते 11 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत डॉ. मुकुंद शिंदे यांच्याकडे कुलसचिवपदाचा पदभार होता. विद्यापीठाने मा. मॅटचा जैसे थे आदेश पाळला. यानंतर  आनंदकर यांनी दि. 14 आणि 15 ऑक्टोबर, 2024 रोजी खाजगी अंगरक्षक घेवून कुलसचिव कार्यालयाचा अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला हे कायद्याला धरुन नाही. अशा महसुलच्या वरिष्ठ अधिकार्याला मा. मॅटचा आदेश समजु नये ही एक शोकांतिका आहे. राज्याची विधानसभा निवडणुका जाहिर होवून आचारसंहिता लागल्यामुळे  आनंदकर हे याच जिल्ह्यातील रहिवासी असल्याने शासनाने त्यांची दुसर्या जिल्ह्यात नियुक्ती कदाचीत केली असावी असे वाटते. शासनाने त्यांची नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्तपदी पदस्थापना केल्याचे कळते.
तत्कालीन कुलसचिव आनंदकर रुजु असतांना बरीच प्रकरणे प्रलंबीत होती.आनंदकर यांचे काळामध्ये त्यांचे विद्यापीठ कर्मचार्यांशी आडकाठीचे वर्तन होते. त्यामुळे प्रशासकीय कामात दिरंगाई होत होती. आश्वाशीत प्रगती योजनेत 12/24 मध्ये कर्मचार्यांना त्यांच्या वागणुकीचा नाहक त्रास झाला. त्यांना भेटायला गेलेल्या प्राध्यापकांना ते अपमानस्पद वागणुक देत असे.  विद्यापीठाला सध्याला एकच कुलसचिव असून याबाबत कुणीही गैरसमज करुन घेऊ नये असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार