यंदा ऊस भावा साठी बैठक आयोजित करा:प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे
यंदाच्या ऊस भाव जाहीर करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखानदारांची बैठक बोलवा : अभिजीत पोटे सन 2023 चालू वर्षाचा हंगाम सुरू होऊन देखील खाजगी व सहकारी साखर कारखान्यांनी उसाचा भाव निश्चित केलेला नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संभ्रमात सापडला आहे दरवर्षीप्रमाणे प्रहार जनशक्ती पक्ष साखर सहसंचालक आर.जे.डी यांच्या माध्यमातून खाजगी व सहकारी साखर कारखानदारांचे चेअरमन व कार्यकारी संचालक (एम.डी) यांना एकत्रित बोलावून व जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या सर्व शेतकरी संघटनांना आमंत्रित करून साखर कारखानदारी बाबत विविध अडचणी वर मात करण्यासाठी एकत्रित बैठका गेल्या 5 वर्षापासून घेत आहोत परंतु साखर सह संचालकांना अहमदनगर जिल्ह्यातील साखर सम्राट न जुमानता या बैठकीला स्वतः चेअरमन व एम.डी उपस्थित न राहता चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा शेतकी विभागाचे अधिकारी या बैठकीला पाठवून देतात यावर साखर सहसंचालक आर.जे.डी मूग गिळून बैठक आटोपती घेतात अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवेळी उसाचे पेमेंट पंधरवाडा ऊस बिल पेमेंट प...