यंदा ऊस भावा साठी बैठक आयोजित करा:प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे

यंदाच्या ऊस भाव जाहीर करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखानदारांची  बैठक बोलवा : अभिजीत पोटे

सन 2023 चालू वर्षाचा हंगाम सुरू होऊन देखील खाजगी व सहकारी साखर कारखान्यांनी उसाचा भाव निश्चित केलेला नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संभ्रमात सापडला आहे 
      दरवर्षीप्रमाणे प्रहार जनशक्ती पक्ष साखर सहसंचालक आर.जे.डी यांच्या माध्यमातून खाजगी व सहकारी साखर कारखानदारांचे चेअरमन व कार्यकारी संचालक (एम.डी) यांना एकत्रित बोलावून व जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या सर्व शेतकरी संघटनांना आमंत्रित करून साखर कारखानदारी बाबत विविध अडचणी वर मात करण्यासाठी एकत्रित बैठका गेल्या 5 वर्षापासून घेत आहोत परंतु साखर सह संचालकांना अहमदनगर जिल्ह्यातील साखर सम्राट न जुमानता या बैठकीला स्वतः चेअरमन व एम.डी उपस्थित न राहता चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा शेतकी विभागाचे अधिकारी या बैठकीला पाठवून देतात यावर साखर सहसंचालक आर.जे.डी मूग गिळून बैठक आटोपती घेतात अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवेळी उसाचे पेमेंट पंधरवाडा ऊस बिल पेमेंट प्रमाणे कधीही पैसे मिळत नाहीत कित्येक साखर कारखाने तोंडी भाव सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करतात याबाबत वेळोवेळी साखर आयुक्त साखर संचालक यांना तक्रारी असलेले शेकडो निवेदन देण्यात आले आहे सर्व सत्यता साखर आयुक्त व साखर सहसंचालक आर.जे.डी अहमदनगर यांना माहिती असून देखील खाजगी व सहकारी साखर कारखानदारांना हे अधिकारी पाठीशी घालताना दिसतात यांना ऊस गळीत परवाना बिन बोभाट दिला जातो
शेतीला जोड धंदा म्हणून उस व्यक्तिचा व्यवसाय करणाऱ्या ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांच्या बाबतीत गेल्या दहा वर्षापासून ऊस वाहतुकीचा दर वाढवण्यात न आल्याने हे ऊस वाहतूकदार पर्याय नसल्याने ट्रॅक्टर ट्रॉली व ट्रकमध्ये ओव्हरलोड करतात तसेच या वाहनाच्या लांबी रुंदीत वाढ करून अपघातास निमंत्रण देऊन रस्ता सुरक्षिततेस यांनी मोठा धोका निर्माण केला आहे यावा तू दारांना ऊस वाहतुकीचा दर वाढवून दिल्यास आपोआपच ओव्हर लोडिंग ऊस वाहतूक कमी होईल व रस्ता सुरक्षिततेचे नियम पाळले जातील व निष्पाप नागरिकांचे प्राण जाण्यापासून वाचतील 

सन 2022 मध्ये साखर सहसंचालक आरजेडी अहमदनगर विभाग यांनी अत्यंत अडगळीच्या अशा अहमदनगर मार्केट यार्ड जवळील चाहूराना शाखेमध्ये बैठक बोलावली होती या बैठकीला कुठल्याही खाजगी व सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व एक दोन एमडी कार्यकारी संचालक सोडता सोडता निर्णय घेऊ शकणारे सक्षम असे कुठलेही अधिकारी या बैठकीला उपस्थित नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित येत ही बैठक उधळून लावली होती व त्याच बैठकीमध्ये साखर सहसंचालक आरजेडी अहमदनगर विभाग यांना आठ दिवसाच्या आत पुणे येथील साखर संकुल येथे साखर आयुक्तांचा अध्यक्षते खाली बैठक बोलावण्याचे मागणीचे निवेदन देण्यात आले होते यावर कुठल्याही प्रकारचे पत्र अथवा उत्तर आज पर्यंत मिळालेले नाही
28 नोव्हेंबर 2023 पर्यंत साखर सहसंचालक आर.जे.डी अहमदनगर विभाग यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांच्या चेअरमन व एम.डी कार्यकारी संचालक यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्ष व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सर्व शेतकरी संघटना आमंत्रित करून बैठक बोलावली नाही तर 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी साखर सहसंचालक आर.जे.डी अहमदनगर विभाग यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करतील अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी दिली

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार