Posts

Showing posts with the label दहा लाख विविध कलम रोपे

रोपवाटीका आता थ्री स्टार

Image
उद्यानविद्या विभाग रोपवाटीका आता थ्री स्टार  महात्मा फुले कृषि विद्यापीठ च्या उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या रोपवाटीकेला भारत सरकारच्या राष्ट्रीय बागवानी बोर्डाद्वारे थ्री स्टार (सर्वोत्तम) दर्जा प्राप्त झाला आहे. ही रोपवाटीका विद्यापीठाच्या स्थापनेपासुनच दर्जेदार, जातीवंत, किडरोगमुक्त कलमे/रोपे निर्मितीसाठी ओळखली जाते. उद्यानविद्या विभागाच्या या रोपवाटीकेत दरवर्षी डाळिंब, आंबा, कागदी लिंबु, सिताफळ, जांभुळ, पेरु इ. फळझाडांची विविध वाणांची निरोगी/दर्जेदार 10 लाखांच्या वर रोपांची निर्मिती करुन ती शेतकर्यांना वितरीत केली जातात. या रोपवाटीकेत तयार झालेल्या कलमे/रोपांना शेतकर्यांकडून प्रथम पसंती असते. म्हणुनच शेतकर्यांना जातीवंत कलमे/रोपे पुरवठा करण्यामध्ये उद्यानविद्या रोपवाटीकेचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. मे-2023 मध्ये गुरुग्राम (हरियाणा) येथील राष्ट्रीय बागवानी बोर्ड यांच्या चमुने मानांकनासाठी रोपवाटीकेची तपासणी केली. यावेळी या रोपवाटीकेत निर्माण केले जाणारे विविध फळझाडांच्या कलमे/रोपांच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच रोपवाटीकेच्या मानांकनासाठी शिफारस केली....