रोपवाटीका आता थ्री स्टार

उद्यानविद्या विभाग रोपवाटीका आता थ्री स्टार 

महात्मा फुले कृषि विद्यापीठ च्या उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या रोपवाटीकेला भारत सरकारच्या राष्ट्रीय बागवानी बोर्डाद्वारे थ्री स्टार (सर्वोत्तम) दर्जा प्राप्त झाला आहे. ही रोपवाटीका विद्यापीठाच्या स्थापनेपासुनच दर्जेदार, जातीवंत, किडरोगमुक्त कलमे/रोपे निर्मितीसाठी ओळखली जाते. उद्यानविद्या विभागाच्या या रोपवाटीकेत दरवर्षी डाळिंब, आंबा, कागदी लिंबु, सिताफळ, जांभुळ, पेरु इ. फळझाडांची विविध वाणांची निरोगी/दर्जेदार 10 लाखांच्या वर रोपांची निर्मिती करुन ती शेतकर्यांना वितरीत केली जातात. या रोपवाटीकेत तयार झालेल्या कलमे/रोपांना शेतकर्यांकडून प्रथम पसंती असते. म्हणुनच शेतकर्यांना जातीवंत कलमे/रोपे पुरवठा करण्यामध्ये उद्यानविद्या रोपवाटीकेचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. मे-2023 मध्ये गुरुग्राम (हरियाणा) येथील राष्ट्रीय बागवानी बोर्ड यांच्या चमुने मानांकनासाठी रोपवाटीकेची तपासणी केली. यावेळी या रोपवाटीकेत निर्माण केले जाणारे विविध फळझाडांच्या कलमे/रोपांच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच रोपवाटीकेच्या मानांकनासाठी शिफारस केली. 
 भारत सरकारच्या राष्ट्रीय बागवानी  बोर्डाकडून या रोपवाटीकेला थ्री स्टार दर्जा प्राप्त झाल्याचे प्रत्राद्वारे कळविण्यात आले आहे. 
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे व उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भगवान ढाकरे यांचे रोपवाटीकेला मानांकन मिळण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. रोपवाटीकेला मानांकन मिळण्यासाठी रोपवाटीकेेचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन मगर,  विजय पवार,  सचिन शेळके व अण्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार