दैनंदिन जीवनात भरडधान्य सेवन तसेच योगा गरजेचा आमदार लहु कानडे
आरोग्यदायी जीवनासाठी आहारात भरडधान्यासोबत नियमित योगाभ्यास गरजेचा- आमदार लहू कानडे मल्टिमिडिया प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे श्रीरामपूर येथे आयोजन - आरोग्यदायी जीवनासाठी दैनंदिन आहारामध्ये भरडधान्याचा नियमित समावेश असला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येकाने पंधरा मिनिटे योगाभ्यास केला पाहिजे. असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो (अहमदनगर) इंडियन रेड क्रॉस सोसायटी (श्रीरामपूर) व श्रीरामपूर नगरपरिषद यांच्या संयूक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य ) वर्ष २०२३” निमित्त श्रीरामपूर येथे १९ ते २१ जून कालावधीत मल्टिमिडिया प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार कानडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, उपविभागीय अधिकारी किरण सावंत, गटविकास अधिकारी प्रविण शिनारे, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, ...