राहुरीत जिल्हा बॅकेचे संचालक तनपुरे की कदम
राहुरीत जिल्हा बँकेचा संचालक तनपुरे की कदम! ऑनलाईन खबर @प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, राहुरी मतदारसंघातून तीन नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्याने राजकीय चर्चेला चांगलाच रंग चढला आहे. आमदार प्राजक्त तनपुरे, राहुरी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष हर्ष तनपुरे आणि देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. त्यामुळे राहुरीत आता ‘तनपुरे की कदम?’ असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र, या निवडणुकीत अखेर माघार कोण घेणार आणि निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक बिनविरोध झाली, तर हर्ष तनपुरे की सत्यजित कदम, यापैकी कोणाला जिल्हा बँकेच्या संचालकपदाची संधी मिळणार, याबाबतही राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. हर्ष तनपुरे यांच्या नावाची चर्चा राहुरीतील सहकार क्षेत्रातील तनपुरे कुटुंबाचा प्रदीर्घ राजकीय व सहकार क्षेत्रातील प्रभाव लक्षात घेता हर्ष तनपुरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. हर्ष तनपुरे यांचे वडील आणि डॉ. तनपुरे सहकारी साखर कारख...