Posts

Showing posts with the label कृषी विभाग

रब्बी पिक स्पर्धेचे आयोजन

Image
राज्यांतर्गत रब्बी हंगाम पीक स्पर्धा २०२५-२६ जाहीर प्रतिनिधी ।  महाराष्ट्र राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्या साठी व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळावे या करीता कृषी विभागामार्फत 'रब्बी हंगाम सन-२०२५-२६' साठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या ५ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पिकांच्या उत्पादन वाढीसाठी विविध प्रयोग करणाऱ्या आणि भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेचे स्वरूप आणि बक्षिसे‌  स्पर्धेचा निकाल तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर जाहीर केला जाईल. तिन्ही स्तरांवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी बक्षिसांचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल   तालुका पातळी : प्रथम- ५,००० रु., द्वितीय- ३,००० रु., तृतीय- २,००० रु. ...