राहुरीत पोलिसांवर हल्ला कायद्याचा धाक कमी झाल्याचा संकेत
राहुरीत पोलिसांवर हल्ला; कायद्याचा धाक कमी झाल्याचे संकेत रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे राहुरी शहरात एका पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यावरच सार्वजनिक ठिकाणी हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. या घटनेमुळे कायद्याचा धाक कमी झाला आहे का, असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. घटनेत जखमी झालेले पोलीस कर्मचारी विलास वैराळ यांच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन जणांना अटक केली असून स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे. मात्र या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार असल्याने तपासाचे आव्हान अजूनही कायम आहे. या घटनेतील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हा प्रकार अनेकांच्या उपस्थितीत घडल्याचे समोर येत आहे. कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांनाच अशा प्रकारे मारहाण होत असेल, त...